STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Fantasy

4  

Dilip Yashwant Jane

Fantasy

मेघराजा

मेघराजा

1 min
266

नको नको मेघराजा

असा छळूस कोणाला

दान देना पावसाचं

अन् भिजव आम्हाला


वाट पाहतच सारं

निजलेलं बी मातीत

आस त्यालाही लागली

फुटेल अंकुर खुशित


साथ सोडलीस अशी

बघू आता कोणाकडे

तहानल्या जमिनीस

कसे गेले बघ तडे


हात लाऊन कपाळी

वाट तुझीच पहातो

तुझ्यासाठी हा आमचा

जीव झुरणी लागतो


दयाघना म्हणे सारे

कर दया आम्हावर

स्वप्ने आम्हीच पहातो

मेघा तुझ्या जीवावर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy