मदनबाण
मदनबाण
चांदणे अंगात माझ्या
का तुला रे लोभविना
रात्र आणि गंध माझा
का तुला रे मोहविना
मी अशी उमलून आले
परी तू निशब्द का?
कल्लोळ दाटे ऊरी
तरीही तु स्तब्ध का?
कंप कंप अंगास माझ्या
तरीही तू शांत का?
अबोल असते प्रितच स्त्रीची
हे तुला माहित का?
वाचले नाहीस का ?
डोळ्यातले आव्हान तू?
हृदयात माझ्या रुतलेला
एक मदनबाण तू!

