STORYMIRROR

Pavan Pawar

Tragedy

3  

Pavan Pawar

Tragedy

मध्यमवर्गीय कर्मचारी

मध्यमवर्गीय कर्मचारी

1 min
191

आशा बाळगतो मनात एक सुंदर घर बनवायचे,

घराच्या पुर्तीसाठी पैशामागे धावायचे

शरीराचे ओझे स्वप्नाच्या विश्वात जो मारी,

असा आहे माझ्या भारताचा मध्यम वर्गीय कर्मचारी


महागाईच्या एका रुपयाचा चढता भाव ज्याचे मुल्य नाही,

तो एक रुपयादेखील याची कंबर खचून देई. विजबीलावर जो प्रत्येक महीण्याला सरकारचे कृत्य नाकारी, 

असा आहे माझ्या भारताचा मध्यमवर्गीय कर्मचारी


मुलांच्या शिक्षणाच्या खर्चावर हा दडपून जाई,

लक्ष्मीच्या कामामुळे ज्याला घिर येई

चादर पाहून पाय पसरविण्याचा जो ठरला मानकरी,

असा आहे माझ्या भारताचा मध्यमवर्गीय कर्मचारी


चुलिचे लाकूड चुलीला जायचे लेकीची चिंता ज्याला सतावयाची,

मुलांच्या भविष्यासाठी स्वःताच्या स्वप्नाची राख रांगोळी करतो

पत्नीच्या सुखाचा जो ठरला अल्पशा मारेकरी,

असा आहे माझ्या भारताचा मध्यमवर्गीय कर्मचारी

    


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy