STORYMIRROR

Rohit Khamkar

Classics Fantasy Thriller

3  

Rohit Khamkar

Classics Fantasy Thriller

मढं

मढं

1 min
190

महत्व नसते स्वार्थाला, जेव्हा मोक्ष दिसत असतो

स्वर्गीय आनंद दिसतो, तेव्हा पाप फेडन्या वेळ नसतो


त्यांना वाटतं सारा विचारांचा खेळ, कोनी तरी मांडून ठेवला

दाखवन्यासाठी का होईना, काही जणांना देव पावला


मिळत गेलं सारं, त्याला आम्ही नशिबाची जोड लावली

सारं काही सुटलं मागं, शेवटी तिरडी सोबत होती सावली


चांगलं वाईट सगळं बोलत होते, मी शांत झाल्यावर

वाटणीला तशी घाई होते, माणसं अशी मेल्यावर


ज्यांच्यासाठी कमावलं, त्यांनीच वाट पाहिली मरणाची

ओल्या डोळा आनंद उत्सव साजरी केला, लाकडं रचत सरणाची


विस्तू माझा तेवत आहे, तोच समोर वारस आले पुढे

मोक्ष मजला माहीत नाही, हसते पाहून आरसा माझे मढे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics