STORYMIRROR

Dipaali Pralhad

Tragedy Others

4  

Dipaali Pralhad

Tragedy Others

मौनाचे आगळेवेगळे सोंग कशाला ?

मौनाचे आगळेवेगळे सोंग कशाला ?

1 min
154

खेळण्यांसारखे मांडून भातुकली परी 

सांग काय ते खेळ होते ना ?

खोट्या आशांचे गुंफलेले  

माझ्याभोवती खोटे कोष होते ना ?


समजले कि समज माझे चुकलेले होते ना?

खरेच मी तुला ओळखते... जाणते 

हे माझेच वेड्यापरी कयास होते ना?


माझ्या प्रत्येक दुःखाचे औषध तूच होतास ना ?

ना संपणारे प्रश्न माझे असले तरी ऊत्तर मात्र तूच होतास ना ?


जरी मी संपली माझ्यात पण उरले मात्र तुझ्यातच होते ना ?

माझ्या हृदयातल्या स्पंदनात आभास मात्र तुझाच होता ना ?


आता किती बरं मी हे स्वतःला समजावण्यात अर्थ होता ना ?

तुझ्या चुप्पीचा अर्थ मात्र वेगळाच होता ना ?


पण मी अजूनही तुझीच आहे ना ?

हे तुलाही तितकच ठाऊक आहे ना ?

मग हे मौनाचे आगळेवेगळे सोंग कशाला ?

बोल हे मौनाचे आगळेवेगळे सोंग कशाला ना ?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy