मायेचे आंगण
मायेचे आंगण
मला आठवते अजुनही ते आंगण...
जिथे होती तुझी सावली...
जपले ते क्षण,वेचले ते कण...
ठेवले जपून मनात..भावनेचे कोंदण!!!
मातीत रुजलेले तुझे हात,
उमलेले ते रोप...हिरवी ती नवलाई,
सुगंध तो फुलांचा,मातीचा,मायेचा,
खोलवर रुजले तुझे आंगण...
मनाच्या तळाशी आणि मुळाशी!!!
बालपण माझे जपले,तारुण्याचे स्वप्नही झेलले..
पाठवणी केली तू मायेने..अश्रूंनी भरलेल्या नयनांनी..
कायमचं दिली साथ..धावली वेळोवेळी,
मजसाठी माझी ती हक्काची सावली!!!
आज वाटे हुरहूर,मनी उठले काहूर,
साथ का ग सुटे माझ्या माहेरची आंगणाची...
तू दिले मला बळ,घडवले माणूसपण,,,
भावनांची शिदोरी दिली बांधून,
पण विसरलीस एक गोष्ट,
नाळ बांधलेली राहिली..नाही सुटली, ती कधीच सुटली नाही... पण मी??
मी स्वतःला शोधते अजूनही...
पूर्ण होताना,अपूर्णता जपताना..
माहेरच्या आंगणात ...मलाच मी न ये ओळखू...
वाटे शोधावे ते हरवलेले मीपण..
जगण्याच्या गडबडीत राहून गेले ते तिथेच ..
माझ्या माहेरच्या आंगणत!!!
