मनाचे वादळ
मनाचे वादळ
कुठे ग बाई जन्म तुझा,
मनातलं तू गाणं....
रंग तुझे अनेक, छटा अनेक,
एकात मिळाले अनेक,पण तरीही,
तू वेगळीच....!!
कुठे तुझा थांग, कुठे तुझा गांव,
मला तर खरंच ठाव नाही..कुठे तुझा मागं...
कधी जनली तू माझ्या मनी,
कधी रुजले तुझे रोप..
फुलली तू माझ्या अंगणी..पण तरीही तू का ग वेगळी...??
कधी वाटे माझे बिंब तू..
कधी वाटे तुझे प्रतिबिंब मी...
कधी वाटे अनोळखी..
कधी ओळखून ही परकी....!!
प्रत्येक नव्या अनुभवाची खूण तू,
प्रत्येक नव्या वेदनेची ओलं तू..
प्रत्येक हासुची ठेव तु,
हर एक रंगाचा थेंब तू...
तूच ग ती माझी सखी
माझी "मनाची भावना"....!!
सोबत माझ्या, संगे माझ्या,
खेळ अनेक खेळ सोबत माझ्या..
तूच ग ती माझी भावना....!!
अस्तित्व माझे तुझ्याबरोबर..
जगणे तुझ्याभोवती...
फेर धरून मजभवती...
का ग तू नाचशी...
कधी तरी चुके ताल, लय..
भीती वाटे ,समजून घेशील ना ग सय..
मनातलं तुझे असणे..राहू दे तिथं
नको मारू तू उसळी,रहा जराशी तू ..
लपून आणि जपून..
भाव माझा मनी..जपू दे तू जरा..!!!!
जपू दे तू जरा....!!!!!
