माया तेचि ब्रह्म
माया तेचि ब्रह्म
माया तेचि ब्रह्म, ब्रह्म तेचि माया l अंग आणि छाया जयापरी ll १ ll
तोडिता ना सुटे, सारिता निराळी l लोटांगण तळी हारपती ll २ ll
दुजे नाही तिथे बळ कोणासाठी l आणिक ते आटी विचाराची ll ३ ll
तुका म्हणे उंच वाढे उंचपणे l ठेंगणी लवणे जैसी तैसी ll ४ ll
