माय मराठी
माय मराठी
माझ्या मराठीची माय
ज्ञानेश्वर माऊली
जात,धर्म ,पंथ
सर्वांवर एकच सावली ||
असे संस्कृतची तनया
तिची गोडी जगावेगळी
जसा तिचा शृंगार
साजे मराठीची संतमंडळी ||
जगी राजा शिवाजी
भूमंडळी झाला
राज्यभाषेचा दर्जा
त्यांच्यामुळे लाभला ||
सर्वा भाषेवर मराठी
सर्वा पुरून उरली
अमृताहून तिची गोडी
सर्वा घेऊन तरली ||
सूरताल ,लय ,नाद
गर्जतो सदा झंकार
अशी माझी मराठी
तिची किमया समुद्रापार ||
