STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Tragedy

3  

swati Balurkar " sakhi "

Tragedy

मास्क

मास्क

1 min
12K

वाटले नव्हतं असं होइल कधी

माणसांचं तर सोडा

सारी दुनियाच आजारी होईल कधी !

माणसं घरात, पक्षी आकाशात

प्रदूषण नाही, कोलाहल नाही

पण मास्क आहे प्रत्येकालाच!

वाटलं नव्हतं असं होईल कधी

सुट्टया असतील पण कैदही असेल

काम नाही पण वेळ खूप असेल!

माणसंच माणसाला भीतील

जन्मला, मेला कुणी, तरी टाळतील!

पृथ्वीच जणू मास्क घालून बसेल

माणसांपासून स्वतःला जपेल !

सेवेकरी, देणेकरी खूप मिळतील

रोगी माणसं निरोग्यावर जळतील!


वाटले नव्हतं असं होइल कधी

सगळं सोडून माणूस बसेल घरामधी!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy