माणूसपणाला थारा द्या
माणूसपणाला थारा द्या
धावपळीच्या साम्राज्यात
दुरावली नाती ही
कारणही आहे तसंच
पैशावरील त्यांचा माज
...जरा थारा द्या या माणूसपणाला
माणसातली माणुसकी
राहिली नाही
सर्वांनाच आहे
पैसे कमावण्याचा ध्यास
...जरा थारा द्या या माणूसपणाला
रक्ताच्या नात्यात
दिसते सुडाची भावना
एकमेकांचा जीव घेणे
हीच त्यांची कामना
...जरा थारा द्या या माणूसपणाला
असले हे आयुष्य
अर्थ नसे या जगण्याला
मेल्यानंतर नसे
अर्थ या पैशाला
...जरा थारा द्या या माणूसपणाला
माणसाला माणसासाठी
नाही असे वेळ
कोणाचाच कोणाशी
नाही असे ताळमेळ
...जरा थारा द्या या माणूसपणाला
चुकला आहे
माणसाचा सुर ताल
म्हणुनी तो मुकला
माणसातल्या माणुसकीला
...जरा थारा द्या या माणूसपणाला
