STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Romance

3  

.प्रमोद घाटोळ

Romance

माणूस

माणूस

1 min
186

तुझेच रूप अन् तुझ्याचं बाता

मोडून काढू फसव्या वाटा..


रंग भंगारलेले विकून टाकू

उदात्त उत्तम हृदयात साठू..


हेका सोडू मी पणाचा

मत्सर न राहो उरात कुणाचा..


कापून टाकू गंडे धागे

जुनाट अज्ञान टाकू मागे..


अल्ला राम हे भिन्न न नावे

सिद्ध करू आम्ही फसवे दावे..


आईचा तर एकच पान्हा

माणूस एक अन् एकच माना..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance