STORYMIRROR

Manisha Awekar

Tragedy

3  

Manisha Awekar

Tragedy

माणूस म्हणून...

माणूस म्हणून...

1 min
241

जेव्हा मी नजर टाकते

सभोवार माणूस म्हणून

कितीतरी गोष्टी शिरतात

डोळ्यांच्या झरोक्यांमधून (1)


बिचारं बालक अगदी

भुकेनं वखवखलेलं

शेजारीच वाढदिवस

अन्न पत्रावळींतून सांडलेलं (2)


झोपडपट्टीत कलकलाट

भांडणांचा कडकडाट

मुलाचा अभ्यास चाललेला

घरात भांड्यांचा खणखणाट (3)


प्रपंच सावरणारी रखमा

नवऱ्याच्या व्यसनाला कंटाळून

तसाच प्रपंच ओढत असते

मुलांना शिकवायचे म्हणून (4)


कुठं रोषणाईचा लखलखाट

कुठं मेजवानीचा थाटमाट

झोपडीत कुणी आसवं गाळतं

कशी घालू हातातोंडाची गाठ? (5)


माणूस म्हणून हे सर्व बघताना

माझी घालमेल होते जीवाची

का रे देवा इतकी विषमता?

जरा समता आण रे न्यायाची!!  (6)


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Tragedy