STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

माणसांच्या गर्दीत

माणसांच्या गर्दीत

1 min
187

रोज तुझ्यावर होत असतो अत्याचार

तरी तुला न्याय मिळत नाही

तुझ्या वेदनांचा मोर्चा काढूनही

अत्याचार थांबत नाही


सजवत असताता तुझ्यावर झालेल्या अत्याचारच्या बातमीने पेपरचे रकाने 

आणि टिव्हीवर दीर्घ चर्चा होत रहाते

तू मात्र निःशब्द होवून

जिवंतपणी मरण पहाते


या माणसांच्या गर्दीतल्या पहात असतात कितीतरी विटालेल्या नजरा तुझ्याकडे 

आणि तुझे शापीत जगणे तू साभांळून घेते

कळतात फक्त त्या मेणबत्तीलाच 

तुझ्या गर्भार जखमा

म्हणून ती स्वतःला जाळून घेते

 

पण तू आता नको उभी राहूस त्या न्यायकक्षेच्या कठड्यात 

करू नकोस न्यायासाठी विनंती

त्या न्यायदेवतेलाही

त्या तराजूच ओझं झाल आहे.


तेव्हा तुझ्यात दडलेल्या ज्वालामुखीला बाहेर काढून

तू एकचदा हो रणचंडिका 

आणि त्याच न्यायकक्षेत छाटून टाक हातपाय त्या नराधमांचे

तेव्हाच सुटेल त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी

तू केलेला न्याय बघण्यासाठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational