मां साहेब जिजाऊ
मां साहेब जिजाऊ
जन्म मानवाचा आहे एकच
हा देह,हे जीवनही आहे एक,
व्यर्थ न जाता लागावे हे सार्थकी
आहे इच्छा मनाची ही एक....
आयुष्याच्या सरतेशेवटी मनिषा असेल एकच
पुन्हा मनुष्य जन्म घ्यावा,
अन् धन्य धन्य होण्यासाठी जन्म
मां साहेब जिजाऊंच्या पोटी घ्यावा...
धन्य ती माय जिजाऊ
ज्यांच्या पोटी शिवराय जन्मले,
धन्य त्या राजमाता जिजाऊ
ज्यांनी शिवछत्रपती घडविले...
दुर्दम्य बुद्धीचातुर्य अन् निष्णात युद्धनिती
रांधायलाही सुगरण सर्वगणसंपन्न ती,
धन्य ती राजमाता अन्
धन्य स्वराज्यजननी ती...
जन्म घेण्या मां साहेब जिजाऊंच्या पोटी
माझ्या पोटीही जन्मा यावी तशीच एक जिजाई,
असावी ती ही निडर,कर्तृत्ववान,सर्वगणसंपन्न
जशा होत्या महाराणी जिजाई...
मिळवा एकतरी जन्म
प्रेम,वात्सल्य,संस्कार तिचे लाभण्यासाठी,
जन्मावी मी मग पुन्हा नव्याने
कुशीत तिच्या खेळण्यासाठी...
जन्माला येण्यास शिवराय पुन्हा
स्वराज्य ते पुन्हा संस्थापिण्यासाठी,
इच्छा न उरावी आता मागे कोणती
फक्त जन्म घ्यावा मां साहेब जिजाऊंच्या पोटी...
