एक दिवा...
एक दिवा...
एक दिवा आपुलकीचा..
एक दिवा प्रेमाचा..
एक दिवा लावू या नवतेजाचा..
एक दिवा करु त्यांनाही अर्पण
ज्यांच्यामुळे,ज्यांच्या बलिदानामुळे
आज आपण सुखरुप आहोत..
एक दिवा दिपवू या त्यांच्यासाठीही
ज्या निष्पापांचा नाहक बळी गेला आहे..
एक दिवा तेजवू या त्यांच्यासाठीही
ज्यांच्या घरात अजूनही फक्त
या दिव्याचाच प्रकाश आहे..
ज्यांची दिवाळी आज आपण दिवे
खरेदी केले तरच साजरी होणार आहे..
म्हणूनच एक दिवा लावू या एकात्मतेचा,
सद्भावना आणि मानवतेचा..
एक दिवा स्वच्छतेचाही लावू या
आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा
कृतीशील निर्धार करु या..
घर, गाव प्रकाशमान करण्याबरोबरच
स्वच्छ व सुंदरही ठेवू या..
