रान सारे पेटलेले
रान सारे पेटलेले
रान सारे पेटलेले..मन हे गहिवरलेले..
धगधगत्या त्या आगीत
दिसतात कष्टही पेटताना..
यातना इतक्या होतात जितक्या
होत नाहीत पायात काटे टोचताना..
घरच्या भुकेल्या जीवांचा चेहरा
डोळ्यांसमोर येतो..
मग आसवांचा पाऊस
त्या आगीच्या ज्वाला विझवायला लागतो..
दु:ख होते काळजाचा तुकडा
जळताना पाहून..
कर्ज,नापिकी न् बाजारभावावाचून
जीवन हे संपवून..
पण विचार येतो,आपल्या मागे
या जीवांचे काय होणार..
अठराविश्व दारिद्र्याची झळ
त्यांनाही बसणार??
नाही नाही..
अंगठेबहाद्दर असलो तरी पोरांना मात्र शिकवणार...
कर्जापायी बाप मेला असला,
तरी डोक्यावरचं कर्ज कष्ट करुनच फेडणार..
पेटलेले रान हे जिद्दीनेच फुलवणार..
न् पेटलेले रान हे कष्टानेच विझवणार..
