"ती"
"ती"
कोणे एके काळी ती होती
समाज बंधनात बांधलेली,
कोणे एके काळी ती होती
उंबरठ्यातच नांदलेली..
कोणे एके काळी ती होती
शिक्षणापासून वंचित
पहुडलेली,बागडलेली
किंचित आणि किंचित..
बालविवाह ही समाजाची
सक्तीच होती तिच्यावरी,
न् सतीप्रथा लावे तिला मृत्युच्या दारी...
चूल आणि मूल हेच होते तिचे कार्यक्षेत्र
वरही न पहायला सदा
झुकलेले तिचे नेत्र..
आता तर म्हणतात,
जन्माला येण्याआधीच ती मेलेली बरी..
नव्हती फुरसत तिला
या जीवघेण्या संसारातून,
नव्हता हक्क तिला
मन मोकळेपणानेे जगण्याचा..
नव्हता तिला स्वत:ची
मते मांडण्याचा अधिकार,
नव्हता हक्क तिचाच तिच्या जीवनावर..
म्हणून एके दिवशी उसळला
महासागर तिच्या उरातून..
काळ बदलला,वेळ बदलली,
बदलला तिने समाज,
स्वत:च्या हक्कांसाठी
स्वत: लढते आहे ती आज..
कोणे एके काळी होती ती अबला
पण आता 'ती'च झाली आहे सबला..
पडते आहे,उठते आहे,
आपल्या ध्येप्राप्तीसाठी ती झटते आहे..
धरुन जिद्द आणि परिश्रमाची कास
यशशिखराची उंची आज 'ती' गाठते आहे..
'चूल-मूल'च्या पलिकडे पाऊल टाकून,
आज ती उंच भरारी घेत आहे..
नानाविध क्षेत्रांत आज आपल्याला
ती दिसत आहे..
बदलला तिने समाज,
बदलली तिने जगण्याची कला,
नाही रोखू शकत आज कोणी तिला..
तिच्या एका एका गुन्हेगाराला,
आज धडा शिकवायचा आहे तिला..
नीडर, कर्तृत्ववान एक मिसाल असलेल्या
स्त्रीच्या या स्त्रीत्वाला आमचा सलाम..
