माझ्यासाठी तु कोण आहे
माझ्यासाठी तु कोण आहे
असीम तुजवर प्रेम माझे
गारूड तुझे मनावर बिंबले आहे
अप्सरासमान रूप तुझे
ज्यास मन सतत पाहे
मनामध्ये विचार फक्त तुझे
निरंतर धुटमळत राहे
जिवनपुष्प मी माझे
तुझ्या चरणी वाहे
तु फुफ्फुसातला श्वास
माझिया मनाचा विश्वास
जिवन वाटेवरचा प्रवास
मनाला तुझाच हव्यास
तुझ्यातच मन गुंतते
तुझ्याशिवाय न राहवते
तुझ्यासोबतच्या क्षणांत हरवते
तू परत येईल, याचीच वाट पाहते

