STORYMIRROR

Anupama TawarRokade

Fantasy

3  

Anupama TawarRokade

Fantasy

माझी पर्स

माझी पर्स

1 min
380

पर्स माझी माझ्यासारखी

हवं नको ते सामावणारी

हातात माझ्या माझाच आधार

कुणी नसेल तेव्हा सोबत करणारी


पर्स माझी मलाच मँचींग

कधी नखरेल कधी रूबाबदार

माझे व्यक्तीमत्त्व खुलवणारी

माझी मैत्रीण असते सदाबहार


पर्स माझी मलाच रेखाटते

अनेक खाते अनेक कप्पे सामावते

वरून दिसते नाजूक साजूक सुंदर

सारे काही तिच्यात सहज विसावते


पर्स माझी खरच जादूची गुहा

पैसा, दागिणे, सजावटीचा सामान

पेन चावी पुस्तके सारे येथे मिळणार

औषधी, मोबाईल तिच्यासाठी एकसमान


पर्स माझी मज देते साथ

शाळा असो वा बाजार

दवाखाना असो वा लग्न

हिच्या शिवाय मी होते बेजार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy