STORYMIRROR

Manisha Nipanikar

Inspirational

3  

Manisha Nipanikar

Inspirational

माझी माय

माझी माय

1 min
168

माय माझी राबणारी., 

उसन उसन हसायची.! 

कष्टणाऱ्या हातांना दिसरात सांगायची., 

थांबू नगस चालत रहा., 

माझी लेकर हाईत शिकायची., 

का कुणास ठाऊक., 

पण कुठल्यातरी आशेवर माय जगायची.!!


माय माझी राबणारी., 

दिवसरात्र झुरायची.., 

उपाशी पोटाला चिमटा काढून., 

आमची पोट भरायची..! 

का कुणास ठाऊक., 

पण कुठल्यातरी आशेवर माय जगायची..!! 


माय माझी राबणारी., 

काटकसरीत संसार करायची., 

दारू पिऊन गावभर हिंडणाऱ्या बापाचा., 

ढोरासारखा मार खायची..! 

तरीबी बापाला जपायची., 

का कुणास ठाऊक., 

पण कुठल्यातरी आशेवर माय जगायची..!!


माय माझी राबणारी., 

इमाने इतबारे वागायची.., 

संस्काराची पुस्तकं अडाणी 

 माय शिकवायची..! 

"माणूस म्हणून जगा.,  

देवाला तोंड हाईत दाखवायची" 


का कुणास ठाऊक., पण

कुठल्यातरी आशेवर माय जगायची..! 

कुठल्यातरी आशेवर माय जगायची..!! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational