STORYMIRROR

Manisha Nipanikar

Others

3  

Manisha Nipanikar

Others

विश्वास

विश्वास

1 min
165

घाव ह्रदयावर कैक झाले.,

हताश बाप रोज पाहते.!

कोरड्या मातीतल्या ओल्या जखमा.,

दगडातल्या देवा मी तुला शोधते.!


काळजातल्या ढीगभर चिंता.,

रोज नव्याने मी वाहते.!

विश्वास बापाचा इतका का तुझ्यावर.?

सांग ठणकावून मी जाब मागते.!


काळ्या मातीत बाप रक्त शिंपीतो.,

संकटे त्याच्या का भाळी तो कुठे चुकतो.?

उपाशीपोटी जगाची पोटे भरूनी.,

बाप माझा आशेवर जगतो.!


हाल त्याचे भयंकर ,घाव का त्यालाच.?

मरणाचे (आत्महत्या)भय मज रोज मारते.!

घाव ह्रदयावर कैक झाले.,

हताश बाप रोज पाहते.!


Rate this content
Log in