परंपरेची बेडी
परंपरेची बेडी
ती जेव्हा वाचू लागली.,
उलगडणाऱ्या पानापानात
स्वतःला शोधू लागली.!
अस्तित्व म्हणजे काय..?
जाणिवा, भावना, घुसमट, वेदना,
यांच्या जखमा शोधू लागली.!
ती जेव्हा वाचू लागली.,
वाचता वाचता स्वतःची
मत स्वतः मांडू लागली.!
शब्दाशब्दांनी संवाद करू लागली.!
रमली होती, गुंतली होती
जिद्द एकवटून शिकत होती.!
अस्तित्व स्वतः चे शोधू लागली..,
ती जेंव्हा वाचू लागली.!
मान्य नव्हते समाजाला, तिचे पुढारलेपण
खुपत होते, नवे दुखणे बोचत होते.!
ही नवीन जाणीव त्यांना मान्य नव्हती.,
स्त्री च्या मनाची घुसमट कायम होती.!
या युगात या काळात
हे शुल्लक वाटत असेल कदाचित.,
पण जेंव्हा जेंव्हा बाई दोन पावले पुढे गेली
तेंव्हा तेंव्हा अग्निदिव्य सोसत होती.!
अजूनही..,
तिचे मागासलेपण कायम आहे.,
कोण म्हणते स्त्री स्वतंत्र आहे...?
गावकोसात जाऊन बघा..,
जखडलेले जीवन तिचे...
अजूनही... पायात परंपरेची बेडी आहे.!
परंपरेची बेडी आहे..!!
