निर्भया
निर्भया
1 min
144
निर्भया तू गेलीस तेंव्हा
फक्त मेणबत्तीच आम्ही प्रज्वलीत केल्या.!
परत परत हेलावली मने
हैवानी वृत्ती नव्याने जन्मी आल्या.!
कदाचित अजूनही असू आम्ही
शुष्क, खरखरीत आणि काटेरी.!
आठवणीत सदैव राहशील तू
येशील परत जन्मून नव्याने जरी.!
पणती होतीस तू भक्षक अंधाराची
फुलण्याआधी शिक्षा कळी चिरडण्याची.!
मुलगी होतीस तू हाच का गुन्हा.?
वांझोट्या न्यायावर आस तुझी माझी.!
अस्तित्व शोधण्याची धडपड निरर्थक झाली
तुझ्यावरचा अन्याय काळजातच सलतो.!
सावित्रीची लेक तू फुलण्याआधी खुडली
अंगणातला दिवा मात्रा दारातच फडफडतो.!
दारातच फडफडतो.!!
