STORYMIRROR

Digamber Kotkar

Inspirational

2  

Digamber Kotkar

Inspirational

माझी माय

माझी माय

1 min
13.4K


गोठ्यामध्ये गाय जशी 
हंबरडा फोडायची,
तसी माझी माय घराच्या 
भिंती आड रडायची... १

माझ्या नशिबीतील सारे
दुःख मिटावे म्हणून,
आपल्या आराध्याला ती
निशिदिनी विनवायची...२

मला उन्हाच्या
झळांपासुन वाचविण्यासाठी,
ती उन्हातान्हात अनवाणी
राबराब राबायची.......  ३

शांतपने झोपावे मी म्हणून
रात रात जगायची,
बाप मारायचा तरीदेखील
बापासवे प्रेमाने वागायची...४

सोसायची सर्व काही,
कुणालाच न सांगता,
आपल्या आयुष्याची कोडी
ती स्वतः सोडवायची.........५

गोठ्यामध्ये गाय जशी
हंबरडा फोडायची,
तसी माझी माय घराच्या
भिंती आड रडायची..........६

 



 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational