पाऊस
पाऊस
1 min
2.7K
पहिला पाऊस मी
तुज डोळ्यांतून झरताना पाहिला
आणि जीव माझा वेडाखुळा
ऊगा तळमळत राहिला...
तुझा तो सोनसळी कुंतलांचा सुवास
नि सदैव झालो मी तुझा गं दास,
तुझा माझ्यावर, माझा तुझ्यावर
सये, अतोनात आहे गं विश्वास...
करतो शरारत खोडसाळ हा वारा
आणितो अंगावर तुझ्या शहारा,
नसे पाण्यालाही तुज तनुवर थारा
ओघळे अंगावरुनी या पाऊसधारा...
वस्त्रांकित तू सुबक कलाकुसर
खिळवी सभोवती माझी ही नजर,
वेडापिसा होई तुझ्या अदांवर
सखा तुझा गं, हा दिगंबर...
