छत्रपती
छत्रपती
1 min
27.6K
सळसळत रक्त
डोळ्यात आग,
रोखूनी श्वास
बघतोय वाघ...१
अशी ही जात
मर्द मराठा,
म्हणून शाबूत
घरचा उंबरठा...२
जयांमुळे अंगणी
डोलते ही तुळस,
शाबूत मंदिरांवर
अजूनी हा कळस....३
रयतेचा हा वाली
गनीमांचा रे काळ,
सोन्याच्या नांगराने
ज्याने नांगरला माळ...४
स्वप्न केले पूर्ण आईचे
निर्मियले हे स्वराज,
अजूनी तो छत्रपती
असे रक्षिण्या सज्य...५
