STORYMIRROR

Bahinabai Choudhari

Abstract Classics

0  

Bahinabai Choudhari

Abstract Classics

माझी माय सरसोती

माझी माय सरसोती

1 min
1.1K


माझी माय सरसोती माले शिकवते बोली लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!


माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता --भागवत पावात समावत आणि मातीमधी उगवत !!


आरे देवाचं दर्सन झालं झालं आपसुक हिरीदात सुर्याबापा दाये अरूपाच रूप !!


तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी देवा तुझ येनजान वारा सांगे कानामधी !!


फुलामधी समावला धरत्रीचा परमय माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय !!


किती रंगवशी रंग रंग भरले डोयात माझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात !!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract