!! माझी माई, सिंधुताई सपकाळ
!! माझी माई, सिंधुताई सपकाळ
चिमुकले ते आयुष्य अंधाराने दाटल....
खेळत्या-बागडत्या वयात
लग्नाच्या बेड्यात अडकलं...
मायाळू त्या माझ्या माईच
का बरं बालपण हरवल....?
परिस्थिलीला स्विकारून तिनं,
आनंदाने संसार सांभाळला...
पण शत्रुनी पसरवलेल्या अफवांनी
आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला...
पतीने साथ सोडली
माहेर परक झालं...
अन् ह्या समाजाने
अर्ध आयुष्य संपवून टाकलं....
अडचणींवरती माथ करत...
फक्त आपल्या लेकीसाठी जगत होती...
डोईवरली छप्पर नव्हतं
तेव्हा स्मशानात
राहण्याची वेळ तिच्यावर आली....
मायाळू, ममताळू माई माझी,
हजारो 'अनाथांची माय' झाली....
बालपण जरी तिचे हरवले...
तरी हजारो लेकरांचं आयुष्य तिने घडवल....
अशी माझी माई
जिजाऊची लेक
सूर्याची किरणं
अन् ह्या जगातल्या सर्व लेकरांची आई,
म्हणजे 'माझी माई, सिंधुताई सपकाळ'
