माझी बाग
माझी बाग
बाग माझी मनोहर
फुले रंगीत, सुंदर
भास हिरव्या रानाचा
माया, हळव्या प्रेमाचा.
ओल टिकेल मातीची
संवर्धन बियाणांचे
कस वाढे जमिनीचा
वृक्ष लतांचे वेलींचे.
एक उपाय हुकूमी
शरीराच्या व्यायामाचा
मोबाईल सोडण्याचा
छंद डोळे निवण्याचा.
रोज नवे फूल फांदी
जन्म नव्या डहाळीचा
निसर्गाच्या नवतीचा
सृजनाच्या आनंदाचा.
स्पर्श मातीचा सुखाचा
घेई गुण निसर्गाचे
मोठेपण त्याग भावा
फूल वाही हळू देवा.
