माझी आई
माझी आई
आई, माझी आई
अन् सगळ्या जगाची ती माई
नाव तिचं माया
अन् सगळ्यांना देते ती छाया
मी म्हणते तिला मम्मी
कधी भासू दिली नाही कशाची कमी
खाईल कमी एक घास
कारण मुलांच्या शिक्षणाचा आहे ध्यास
शिक्षणाची खूप होती ओढ
पण घरच्या परिस्थितीने घातली मोड
म्हणूनच शिक्षण तिचं जेमतेम
पण उरी आहे खुप मोठं Aim
Single Parent असुनही दिले तिने सुसंस्कार
खरचं आहे कोणी फेडू शकत नाही आईचे उपकार
