STORYMIRROR

Priti Athawale

Others

1.7  

Priti Athawale

Others

माझे बाबा

माझे बाबा

1 min
31.1K


उडणार्या कबुतरांना पाहून

वाटले पाहूया निरोप देउन

सांगतील ते माझ्या बाबांना

हलके करतील माझ्या दुःखाना


नुकतेच जग कळायला लागले होते मला

याची काळजी वाटली नाही त्याला

घेउनी गेला माझ्या बाबांना

सोबत नेले माझ्या सुखांना


सायंकाळी येते बाबांची आठवण

मनात असते आठवणींची साठवण

अश्रू असतात साथीदार माझे

हसवू शकत नाही जग हे तुझे


देवावर करते मी आरोप

माझ्या बाबांना माझा निरोप

दुःखाचा डसविला त्याने नांगा

कबुतरांनाे, बाबांना माझी खुशाली सांगा


Rate this content
Log in