माझे मन
माझे मन
मज मनात येई काय असे बोलावे
व्हावे पाखरू अन् भूर असे उडावे
स्पर्श कळीचा गंध मातीचा क्षणात अनुभवून घ्यावे..!!
मज मनात येई काय असे बोलावे
घेऊनी लेखणी शब्द पर्णी उतरवावे
शब्दाचे गीत होऊनी सुर कंठीचा नाद दुमुदुमुनिया जावे ..!!
मज मनात येई काय असे बोलावे
व्हावे बाळ अन् आईच्या कुशीत यावे
मायेची ऊब प्रितीची साऊली विसावा मजिया व्हावे ..!!
