सीमा
सीमा
तुला कळायला हव होत
मला नाही व्यक्त होता येत
अल्लड आहे मी
मनाच्या कोपऱ्यात ,नाही मला जाता येत..!१!
तुला कळायला हवं होतं
मला नाही स्पंदन येत
तुझ हवं असणं मला हवे , पण..
वेदनेच्या कोपऱ्यात, नाही मला जाता येत..!२!
तुला कळायला हवं होतं
मला नाही स्वच्छंद फिरता येत
लाजाळू आहे ना मी ,
हृदयाच्या कोपऱ्यात, नाही मला जाता येत..!३!
कसं काय कळत नाही रे तुला ?
धडधडण माझा स्वभावच आहे ..
कसं काय कळत नाही रे तुला ?
धडधडण माझा स्वभावच आहे ..
शिस्तीत थोडीच राहते मी ,
अनुशासनाच्या रुपरेशेत , मला नाही जाता येत..!४!
जा..... असा कसा हट्ट तुझा
मनाच्या वेगेने शोध घेशील तू माझा...
सांग ना.. नाही ना अंतर देणार तू मला
अंतरेच्या सीमेत मला नाही जाता येत..!५!
