STORYMIRROR

PRANJALI DANDE

Inspirational

3  

PRANJALI DANDE

Inspirational

माझे मन

माझे मन

1 min
146

मज मनात येई की काय असे बोलावे 

व्हावे पाखरू अन् भुर असे उडावे ;

वाऱ्यासावे होऊनी एक , सर्वत्र फिरुनी यावे 

स्पर्श कळीचा गंध मातीचा क्षणात अनुभवून घ्यावे ..!


मज मनात येई की काय असे बोलावे 

व्हावे घेऊनी लेखणी शब्द पर्णी उतरावावे ; 

कल्पनेला वाव द्यावी , माझ्या शब्दाचे गीत व्हावे 

गीत सुरांचे स्वर कंठीचा दुमदुमुनिया जावे ..!


मज मनात येई की काय असे बोलावे 

व्हावे बाळ अन् आईच्या कुशीत यावे ; 

कोवळ्या मनाचे , प्रेमळ स्वरूप जगासमोरी आणावे 

छत्र मायेचा ओलावा प्रितीचा आसमंती दरावळावे ..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational