भावनेचा आकार
भावनेचा आकार
दे, मनातल्या शब्दांना भावनेचा आकार..!
तुझ्याशी बोलून करते मी साकार ,
माझ्या या शब्दांना देऊ नको नकार ,
तुझ्यातल्या प्रेमाला दिला मी होकार ,
वसंत ऋतूतर प्रेमाला येतो बहार... !!१!!
दे, मनातल्या शब्दांना भावनेचा आकार..!
लेखणीने लिहून करते मी साकार,
न वाचून शब्दांना देऊ नको नकार ,
खरोखरच्या बंधनाचा हा आहे होकार ,
स्वतःतल्या जाणिवेचा ओळख बहार... !!२!!
दे, मनातल्या शब्दांना भावनेचा आकार..!
मनोमनी करते हृदयात साकार ,
माझ्याप्रती नाही तुला हा नकार ,
डोक्यातील भाव जाण मी समजेल तुझा होकार ,
स्वतःला फुलवून दे जगाला बहार... !!३!!
दे, मनातल्या शब्दांना भावनेचा आकार..!

