माझे जीवन …
माझे जीवन …
काहीच चूक नाही माझी
तरी सजा भोगतो आहे,
देवा तुझ्या या जगती मी
उदासवाणी जगते आहे … १
माझे माझे म्हणून ज्यांना
हृदयी मी रे जागा दिली,
दगा देऊन त्यांनीच माझी
कशी उडवली बघ खिल्ली …२
सुखी क्षण माझ्या नशिबी
लिहिण्याचे विसरला कसा,
कष्ट करून बघ शरीराच्या
उघडया पडल्यात रे नसा ….३
काळ बदलला, वेळ बदलली
बदलले नाही रे माझे प्राक्तन,
विश्वास आहे तुझ्यावर म्हणून
हवाली केले तुझ्या हे जीवन ….
