माझे घर
माझे घर
असे आहे माझे घर
आचार विचार हि घराची आहे,
प्रेम हा घराचा पाया आहे.
थोर मानसे या घराच्या भिँती आहेत,
सुख हे घराचे छत आहे.
जिव्हाळा हा घराचा कळस आहे,
माणुसकि ही घराची तीजोरी आहे.
गोड-शब्द ही घराची धन-दौलत आहे,
शांतता ही घराची लक्ष्मी आहे.
आत्मविश्वास हाच घराचा देवारा आहे,
पैसा हा घराचा पाहुना आहे.
गर्व हा घराचा वैरी आहे,
नम्रता हीच घराची प्रतिष्ठा आहे.
सदाचार हा घराचा सुगंध आहे,
चारित्र्यसंपन्नता हीच घराची किर्ती आहे.
