माझा सैनिक..
माझा सैनिक..
माझा सैनिक उभा आहे सीमेवर.. देशाचे रक्षण करत,
थंडी - वाऱ्याला निधड्या छातीने दूर सारत,
देशाच्या रक्षणासाठी आपल्या परिवारालाही विसरत,
देशाला वाचण्यासाठी स्वतः वीरमरण पत्करत,
.
.
.
पण जर नसत्याच कधी या लढाया,
जाती - जातीवरून..
धर्मा - धर्मावरून..
देशा - देशावरून..
तर.. माझा सैनिक वाचला असता..
