Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Neha Ranalkar

Inspirational

3  

Neha Ranalkar

Inspirational

माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र

1 min
182


संत महंताचा माझा महाराष्ट्र

तसाच आहे प्रकांड पंडितांचा |

कणखर माणसांचा जरी दिसे

आहे मेणाहूनी मऊ हृदयांचा | |१| |


दगड धोंड्याचा माझा महाराष्ट्र

वृक्षपर्वत राजींनी असे सुशोभित |

शेती, उद्योग, धंदे शिक्षणसंस्था

स्वयंचलित प्रकल्पांनी सुयोजित | |२| |


भिन्न जाती,धर्मांचा माझा महाराष्ट्र

घडवी विविधतेत एकात्मतेचे दर्शन |

विविध भाषा वेशभूषांचा,संगीत ,

नाटय,चित्रपट,कला भूषवी नर्तन | |३| |


माझा महाराष्ट्र आहे कला,शिक्षण

ज्ञान,विज्ञानांत पुर्णत: निपूण |

तत्पर सदा देश रक्षणाच्या कार्यात

दुःख संवेदना सर्वांच्या घेई टिपून | |४| |


माझ्या महाराष्ट्र वाहती निर्झर

खळाळणाऱ्या नद्या पवित्र |

हिरव्या निसर्ग सौंदर्याने नटलेला

माझा महाराष्ट्र शोभतो सचित्र | |५| |


Rate this content
Log in