माझा कुणा म्हणू मी
माझा कुणा म्हणू मी
कसा वादळाने घणाघात केला
किती पावसा नाच दारात केला
अता ओळखीचे कुणी राहिले ना
गुलाबी फुलाने कसा घात केला
सुरा आपल्यांच्याच हातात होता
उरी वार त्यांनी धुक्यात केला
छळे वेदना ही मला अंतरीची
सुगंधी दवेने मला वात केला
तुझा चेहरा ओळखीचा मलाही
कसा अंत एकाच वारात केला
कुणाला म्हणावे इथे आपले मी
कसा मोगर्यानेच आघात केला
जपावे कसे मी इथे काळजाला
उभा नाच त्यांनी स्मशानात केला
