STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

4  

Sangam Pipe Line Wala

Romance

माझा छंद

माझा छंद

1 min
566

मला साजणी तुझ्या प्रेमाचा छंद 

आवडतो तुझ्या रूपाचा गुलकंद...


सोन्याहून पिवळं निराळं तुझं रुप 

तुझ्यापुढे मजला जग वाटे कुरूप 

किती गोड असेल तुझ्या प्रेमाचा कंद...


साधी आहेस माझी राणी सरळ तू 

प्रेमाची अशी पाडली मला भुरळ तू 

दुराव्याचे आवडेनात मला करवंद...


पाहून वेडा झालो ती अदा मस्तानी 

सारखी आठवण येते तुझी झोपतानी 

गाल लाल तुझे जसे कश्मिरी सफरचंद...


संगमच काय तो आहे तुझाच गुलाम 

सारं जीवन केलं तुझ्यासाठी नीलाम 

वेडा झाला रुप पाहून गोकुळातला नंद...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance