माझा आवाज
माझा आवाज
कधी संपणार ही विकृती,
क्षणिक सुखाच्या आनंदासाठी विसरली जाणारी
आई बहिणीची नाती
एकतर्फी प्रेम करता तुम्ही
शिकार होते ती त्या निरागस जीवाची
कधी ऍसिड, कधी सामूहिक, तर कधी शब्दांचा बलात्कार
कधी दूर होणार तुमचा मानसिक विकार
शिकाऱ्याला नाही कायद्याची भीती
तो काढतोय कपडे आमचे
पण कायदा मात्र घालतोय त्याला गुन्ह्याचे कपडे,
जगायचंय आम्हाला पण
मुक्त आणि सुरक्षित
