माह्य गाव
माह्य गाव
गांव माह्य आहे लहानसं
गावात माह्या हाय नदी
गावाईतले लोक हाय मस्त
कामं करते आवडीने संमदी..!
शेतकरी माह्या गावातले
कष्ट करते रात्रं दिसाला
ईसरून जाते ते संमदच
जवळ करतेस कामाला..!
एकता हाई माह्या गावात
संमद्याच गावकऱ्यांची
परमाणिक हाय माह्य गाव
कायजी करते समद्यांची..!
दोन दिस येईन सुखाची
दोन दिस येईन दुःखाची
मिळून रायते गावतले लोक
साथ हाय त्यांची परमाची..!
माह्या गावात होते लय
लय सत्संगाचे कार्यक्रम
गावातले लोक लावते
ऐकासाठी क्रमाने क्रम..!