लॉकडाऊन
लॉकडाऊन
नैराश्याचे हे दिवसही निघून जातील,
हे सर्व लोकं पुन्हा जवळ येतील...
नको काळजी, नको गर्दी, नको भय कशाचे,
रक्षण करु स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे...
नाही मिळाला होता असा वेळ आपल्या माणसांसोबात घालवायला,
नशिबाने एकत्र आलो आहोत सगळे, तर हवेत हे क्षण जपायला...
एका अर्थी बरेच झाले, आहे सर्वत्र लॉकडाऊन,
एकमेकांशी बोलायला आता नाही कोणतेच काउंटडाऊन...
नवरा-बायकोचं नातं हे पुन्हा बहरुन आलंय,
आई-मुलाच्या नात्याला नवं वळण लागलंय...
>
मुलांना आणि पालकांना एकत्र वेळ मिळतो आहे,
पालक मुलांच्या सुप्त कलांना वाव देतो आहे...
पुन्हा ते बालपण जगायला मिळतंय,
रामायण, महाभारत, शक्तिमान पाहता येतंय...
नाव, गाव, फूल, फळ, राजा, राणी, चोर, शिपाई, पत्ते, आठचल्लस हे खेळ पुन्हा आलेत,
वरण, भात, चपाती, भाजी यामुळे पिझ्झा, बर्गर पळून गेलेत...
दिवस हे मिळाले आहेत, जगून घ्या यांचा प्रत्येक क्षण,
आयुष्यभर आठवण काढतील या दिवसांची प्रत्येक जण...
आयुष्यभर आठवण काढतील या दिवसांची प्रत्येक जण...