STORYMIRROR

AMRAPALI CHAVAN

Inspirational

3  

AMRAPALI CHAVAN

Inspirational

अंधारातून प्रकाशाकडे

अंधारातून प्रकाशाकडे

1 min
965

परिस्थिती बदलायला लागत नाही वेळ,

निसर्ग व माणसाचा सुरु आहे खेळ..


स्वच्छंद फिरणारी माणसं आज कोंडून बसली आहेत घरात,

प्राणी, पक्षी मात्र विहार करत आहेत मोकळ्या निसर्गात..


नाही गाड्या, नाही कारखाने, नाही आहे प्रदूषण,

सर्वत्र आहे स्वच्छ हवा आणि हिरवळ कारण निसर्गाचे होत नाही शोषण..


कोरोनाचं सावट जरी वाढत चाललं आहे,

माणसांमधील बंध मात्र घट्ट होत आहे..


नाही शॉपिंग, नाही कसले हट्ट तरीही माणूस आहे सुखी,

आता कळले त्याला, नको त्या गोष्टींमागे उगाच होतो 'मी' दुःखी..


आताही वेळ आहे स्वतःला सावरण्याची,

गरज आहे स्वतःला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची..

गरज आहे स्वतःला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational