'कोरोनाचा आहेर'
'कोरोनाचा आहेर'
1 min
24
कोरोनाच्या विळख्यात हे सर्व जग आहे,
का कोणास ठाऊक असे का घडते आहे???
यमदूत लोकांचे प्राण घेतो आहे,
परंतु लोकांमधले अज्ञान त्यांना अंधःकारात नेत आहे...
डॉक्टर्स, नर्स, पोलीस जीव मुठीत घेऊन परिस्थितीशी झुंझत आहेत,
लोकं मात्र लॉकडाउनची ऐशी की तैशी करत आहेत...
कोणीतरी सांगा या लोकांना परिस्थिती खूप गंभीर आहे,
नाही पाळले नियम तर आयुष्याचा शेवट आहे...
नका करू गर्दी, नका जाऊ घराबाहेर,
नाहीतर घेऊन याल घरात 'कोरोनाचा आहेर...'
नाहीतर घेऊन याल घरात 'कोरोनाचा आहेर...'