STORYMIRROR

SAURABH AHER

Inspirational Others

4  

SAURABH AHER

Inspirational Others

लेक

लेक

1 min
503

दिन भाग्याचा तोच

लेक पोटी जन्मा येते ...

धन्य कुळ गोत्र होई ,

सारे भाग्य उजळते ..


लेक अल्लड मनाची 

लेक सौख्याचं आंदण ..

ॠण लेकीचे हे थोर

भाळी सुखाचं गोंदण ..


माय बापाचा आधार

लेक दारात तुळस ..

माझ्या संसार मंदीरी

लेक झालीसे कळस ..


दोन दिसाची पाहुणी 

जीवा वाटे हुर हुर ..

पोरी बापाला सोडुन 

कधी जावू नको दूर..


लेक प्रेमाची शिदोरी 

लेक अनमोल धन ..

लेक संस्कार पेरणी

लेक रत्नाची खाण ..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational