लेक लाडकी
लेक लाडकी
लेक माझी सोनुली लाडकी
प्रेमाने लाडाने वाढवली
शिक्षणाने ज्ञानी ती बनली
लग्नाची झाली की परक्यास
देऊनी मी एकटी पडली.....१
पहिली बेटी धनाची पेटी
म्हणतात सारे नातलग
लाडात वाढवुनी परकी
करतो एका लग्न क्षणात
आईबाबांची ती लाचारकी......२
कन्यादान करण्याच्या वेळी
किती होत असे तगमग
एक आईचा जीवच जाणे
रीत परंपरा ती पाळतो
नको वाटते दान करणे.......३
लेक लाडाची होई पाहुणी
अजब जगाची रीत आहे
मुलगा मुलगी समानता
मग ह्यात नको का बदल
थोडीसी रीत ती बदलता.!.....४
नवे तंत्रज्ञान वापरतो
आता बदला थोडे विचार
बुरसटलेल्या परंपरा
सोडून देणे ह्यातच हीत
अन् ह्या लाडलीस सावरा......५