लावण्यात नाहते मी...
लावण्यात नाहते मी...
लावण्यात नाहते मी
तुझ्या प्रेमात जगते
बाहुपाशात रमते
गोड स्वप्नी विसावते
सोळा शृंगार करुनी
आरशात मी लाजते
कासावीस होऊनीया
वाट तुझीच बघते
प्रेमात बहरूनीया
साद तुला घालते रे
बाहुपाशात तुझ्याच
निश्चित सुखावते रे
सोबत असू कायम
अतूट आपली प्रीत
तू मला मी तुला असू
हीच संसाराची जीत

